¡Sorpréndeme!

Ajit Pawar Baramati | काका लोकांना विश्वासात घ्यावं लागत, अजितदादांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

2025-04-13 0 Dailymotion

Ajit Pawar Baramati | काका लोकांना विश्वासात घ्यावं लागत, अजितदादांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा 
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. बारामतीमध्ये विविध कार्यक्रमांना अजित पवारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमांना संबोधित करताना आपल्या खास शैलीत अजित पवार बोलत होते. 
बारामतीत  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते विद्यार्थ्यांना चष्मा वाटप.... गाजर खाल्लं की चष्म्याचा नंबर कमी होतो - अजित पवार..... मित्रांनी हिणवलं तर चष्मा काढू नका ! दादांचा विद्यार्थ्यांना सल्ला   बारामतीत पंचायत समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रत्ननिधी ट्रस्टच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांना चष्मे व पुस्तकांचं वाटप करण्यात आलेय. एवढी अजित पवारांनी विद्यार्थ्यांना एक सल्ला दिलाय. तुम्हाला जर मित्रांनी मैत्रिणींनी चष्मा घालण्यावरून हिणवलं तर त्यांचं काही ऐकू नका चष्मा वापरला तर तुमचे डोळे चांगले राहतील. डॉक्टरांनी सांगितलेला सल्ला ऐकला तर चष्म्याचा नंबर कमी होईल असं दादा म्हणाले. डॉक्टर म्हणतात की गाजर खा म्हणजे चष्म्याचा नंबर कमी होतो हे सांगायलाही दादा विसरले नाहीत....